Year Ender 2018 : भाजपसाठी 2018 वर्ष कसे होते: त्रिपूरामध्ये लेफ्ट पार्टीला हरविले, तर 'या' राज्यात भाजप सत्तेचा पराभव
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा (फोटो सौजन्य- PTI)

भारतीय जनता पार्टीसाठी (BJP) यंदाचे वर्ष काही खास नव्हते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाला जिंकून देण्यासाठी भरपूर मेहनत केली. परंतु काही राज्यांमधून भाजपची लाट या वर्षात ओसरलेली  पाहायला मिळाली आहे. या सर्व प्रकरणी भाजपची सत्ता पूर्णपणे भारतातून नष्ट झालेली नाही. तर भाजपसाठी 2018 चे निवडणुक आणि पोटनिवडणुकींसाठी हे वर्ष कसे होते हे पाहूया-

जानेवारी- राजस्थान आणि बंगालच्या पोटनिवडणुकीत पराभव

जानेवारीमध्ये राजस्थान मधील अलवर आणि अमजेर, त्याचप्रमाणे बंगाल मधील उलूबेरिया लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुक झाली. मात्र भाजपला या तिन्ही जागांवर हार पत्करावी लागली. तसेच राजस्थानच्या दोन जागांवर काँग्रेस आणि उलूबेरिया येथून तृणमूल काँग्रेस पक्षाचा विजय झाला.

फेब्रुवारी - त्रिपूरामध्ये लेफ्ट पार्टीला हरवून भाजप सत्ता 

फेब्रुवारी महिन्यात त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकामध्ये भाजपने बहुमताने विजय मिळवत लेफ्ट पार्टीची गेली 25 वर्षाची सत्ता मोडीत काढली आहे. त्रिपुराच नाही तर मेघालय आणि नागालँड येथे भाजपने तेथील स्थानिक पक्षांसोबत हात मिळवणी करुन सत्ता स्थापन केली.

मार्च- गोरखपुर आणि फूलपुर पोटनिवडणुकीत पराभव

उत्तर प्रदेशातील दोन मुख्य लोकसभेची जागा गोरखपुर आणि फूलपुर येथे झालेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव पाहायला मिळाला. तर दोन्ही जागांवर समाजवादी पार्टीच्या उमेदवार जिंकून आले. तर बिहारमधील अररिया लोकसभा पोटनिवडणुकीत ही भाजपचा पराभव झाला.

मे- कर्नाटकमध्ये दणदणीत पराभव

कर्नाटकमध्ये मे महिन्यात विधानसभा निवडणुक झाली. तर भाजप ही सर्वात मजबूत पक्ष कर्नाटकमध्ये समजला होता. परंतु निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने जेडीएस पक्षाला समर्थन देत एच.डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री बनविले.मे महिन्यातच उत्तर प्रदेशातील कैराना आणि महाराष्ट्रातील पालघर व भंडारा- गोंदिया येथे लोकसभा पोटनिवडणुक झाली होती. परंतु फक्त पालघरमध्येच भाजपला जागा मिळाली. तर कैराना येथे आरएलडी आणि भंडारा-गोंदिया मध्ये एनसीपीच्या उमेदवार जिंकून आला होता. (हेही वाचा-पंतप्रधान मोदींना पक्षातूनच धक्का? कट्टर विरोधकाला भाजममध्ये मोठी जबाबदारी)

जून- जम्मू आणि काश्मिर मधून भाजपने पीडीपीचे समर्थन पाठी घेतले

जून महिन्यात जम्मू आणि काश्मिर मध्ये पीडीपी सोबत असणारी युती भाजपने मोडीत काढली. सीजफायर समवेत अनेक मुद्द्यांवरुन या दोन्ही पक्षात वाद निर्माण होत आहे.

नोव्हेंबर- कर्नाटक पोटनिवडणुकीत पराभव

नोव्हेंबरमध्ये कर्नाटकच्या तीन लोकसभा जागांसाठी पोटनिवडणुक झाली. शिमोगा, बेल्लारी आणि मांड्या अशा तीन जागांसाठी निवडणुक लढविण्यात आली. त्यातील बेल्लारी आणि मांड्या येथील जागेवर भाजपला हार मानावी लागली. तर शिमोगा येथील जागा भाजपला कायम राखता आली.

डिसेंबर- मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे भाजपची लाट ओसरली

डिसेंबर महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्यातील मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे भाजप सरकार होते. परंतु काँग्रेस पक्षाचा या तीन जागांवर विजय झाल्याने भाजपची सत्ता निघुन गेली. तसेच तेलंगणा मधील तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) तर मिझोराम येथे मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) या पक्षांचा विजय झाला. या 2019 मधील निवडणुक ही उपात्यंपूर्व फेरी प्रमाणे झाल्याने तीन राज्यात भाजप सरकारला परभाव स्विकारावा  लागला आहे.