पंतप्रधान मोदींना पक्षातूनच धक्का? कट्टर विरोधकाला भाजममध्ये मोठी जबाबदारी
pm modi | (file photo)

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तिसगड, तेलंगणा आणि मिझोरामध्ये झालेल्या पराभवानंतर भाजप (BJP) गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे तर हा पराभव धोक्याची घंटा आहे. त्यामुळे भाजपमध्ये पडद्यामागून पुनर्बांधणी सुरु असल्याचे समजते. एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी १७ राज्य प्रभारींची नियुक्ती जाहीर केली. या नियुक्ती यादीत गोवर्धन झडपिया (Gordhan Zadaphia) यांचेही नाव आहे. गोवर्धन झडपिया हे पंतप्रधान मोदी (PM Modi) यांचे भाजपमधील कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. ते गुजरातमधील वजनदार नेते आहेत. त्यामुळे झडपिया यांचे पुनरागमन हे पंतप्रधान मोदींना धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. झपाडीया यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी (BJP UP election chief ) आहे.

एक्सप्रेस समुहाच्या एका प्रादेशिक वृत्तपत्राने एनडीटीव्हीच्या वृत्ताचा हवाला देत म्हटले आहे की, २०१९ मध्ये केंद्रात पुन्हा सरकार बनवण्यासाठी उत्तर प्रदेशची लढाई जिंकणे भाजपासाठी अत्यंत महत्वाचे आहे. विद्यमान पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळात झडपिया हे गुजरातचे गृहराज्यमंत्री होते. या काळातच गुजरातमध्ये (2002) दंगल झाली होती. दरम्यान, दंगल काळात झालेल्या हिंसाचारात योग्य पावले उचलली नाहीत असा आरोप झाल्यावर झडपिया यांना मोदी मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री मोदींविरोधात जाहीर मोहीम उघडली होती. ते मोदींवर जाहीरपणे टीका करत.

दरम्यानच्या काळात झडपिया यांनी 2007मध्ये राजकीय पक्षाची घोषणा केली. तसेच, भाजपविरोधात निवडणूकही लढवली. पुढे मोदींचे कट्टर टीकाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केशुभाई पटेल यांच्यासोबत हातमिळवणी केली होती. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेतून प्रविण तोगडिया यांना आश्चर्यकारकरित्या एक्झिट घ्यावी लागली. तोगडीयांची एक्झिट होताच झडपिया यांचे भाजपमध्ये वजन वाढले.

दंगलीच्यावेळी हिंसाचार रोखण्यासाठी योग्य पावले उचलली नाहीत असा त्यांच्यावर आरोप झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदींनी गोवर्धन झडपिया यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर त्यांनी जाहीरपणे मोदींवर टीका करण्यास सुरुवात केली होती. २००७ साली त्यांनी स्वत:चा पक्ष बनवला व भाजपा विरोधात निवडणूक लढवली. त्यानंतर झडपिया यांनी नरेंद्र मोदींचे कडवे टीकाकार केशुभाई पटेल यांच्याशी हातमिळवणी केली. पुढे 2014मध्ये तर त्यांनी भाजपमध्येच घरवापसी केली. प्रविण तोगडिया यांची विश्व हिंदू परिषदेतून एक्झिट झाल्यानंतर गोवर्धन झडपिया यांनी पक्षनेतृत्वाची मर्जी संपादन केली. (हेही वाचा, भाजपमध्ये खळबळ! मोदींना हटवा, गडकरींना पाठवा; शेतकरी नेत्याची आरएसएसकडे मागणी)

दरम्यान, एकेकळी झडपिया हे प्रविण तोगडीया यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. तसेच, गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांच्या नेता म्हणून उभारणी आणि विस्तारामागे झडपिया यांचाचा हात असल्याची चर्चा गुजरातच्या राजकारणात पाहायला मिळते. त्यामुळे मोदींचे कट्टर विरोधक असलेले असे झडपिया यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे आगामी काळात पंतप्रधान मोदींना हा मोठा धक्का तर नाही ना? असा सवाल उपस्थित करत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहेत.