भाजप पक्ष (संग्रहित, संपादित, प्रातिनिधीक प्रतिमा)

लोकसभा निवडणुकीसाठी आज (16 मार्च) भाजप पक्षाकडून आपल्या उमेदवारीच्या पहिल्या यादी घोषणा काही वेळातच जाहीर करणार आहे. या यादीमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान ज्या जागांसाठी होणार आहे अशा उमेदवारांची नावे पुढे येणार असल्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 91 जागांसाठी 11 एप्रिल रोजी होणार आहे.

निवडणुक आयोगाच्या मते, 17वी लोकसभेच्या 545 खासदारांच्या जागेसाठी 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 11 एप्रिल ते 19 मे महिना असे सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर 23 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपच्या उमेदवारीच्या यादीसाठी नावे जाहीर करण्यात येणाऱ्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मुख्य नेते उपस्थित असणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथे 42 जागांसाठी होणार आहे. त्याच्याव्यतिरिक्त 11 एप्रिलला उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाम येथील जागांसाठी मतदान होणार आहे.(हेही वाचा-Lok Sabha Election 2019: #MainBhiChowkidar गाण्याचा व्हिडिओ शेअर करत नरेंद्र मोदी यांचे भाजप प्रचार अभियान सुरु)

परंतु भाजप पक्षाची यादी जाहीर होण्यापूर्वी असे तर्कवितर्क लावले जात आहेत की, भाजपातील काही वर्तमान खासदारांना तिकिट देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचसोबत महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान मधील जागांसाठी सुद्धा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.