File image of PM Narendra Modi | (Photo Credits: PTI)

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी सर्वच पक्ष कामाला लागले असताना भाजप (BJP) पक्षाची देखील जोरदार तयारी सुरु आहे. उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यासोबत जोरदार प्रचारालाही सुरुवात झाली आहे. 'अब की बार फिर मोदी सरकार' यानंतर 'मोदी है मुमकिन है' हे नवे घोषवाक्य चर्चेत आहे. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणूकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मैं भी चौकीदार' या खास गाण्याचा व्हिडिओ ट्विटर वर शेअर केला आहे.

या ट्विटमध्ये मोदींनी लिहिले की, "तुमचा चौकीदार सक्षमपणे उभा आहे आणि देशाची सेवा करत आहे. पण मी एकटा नाही आहे. प्रत्येकजण जो भ्रष्टाचार, समाज्यातील वाईट गोष्टी, अस्वच्छता याविरुद्ध लढत आहे तो चौकीदार आहे. प्रत्येकजण जो देशाच्या विकासासाठी लढत आहे तो चौकीदार आहे. आज, प्रत्येक भारतीय बोलत आहे मी चौकीदार आहे."

नरेंद्र मोदी यांचे ट्विट:

3.45 मिनिटांच्या या व्हिडिओत सरकारी कामांचे दर्शन घडते. व्हिडिओच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मार्च संध्याकाळी 6 वाजल्यापासून हे कार्यक्रम सुरु होईल.

ही निवडणूक देशात सात टप्प्यात होणार असून 11 एप्रिल पासून मतदानाला सुरुवात होईल. 19 मे ला शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान पार पडेल. तर 23 मे रोजी मतमोजणीला सुरुवात होईल.