
Patana Crime News: बिहारची राजधानी पाटणा येथेल एका हॉटेलमध्ये एका महिला पोलिस कॉन्स्टेबलचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे हॉटेल परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. पाटणा येथील जहानाबाद येथील एका तरुणाच्या नावावर ही खोली बुक करण्यात आली होती.महिला कॉन्स्टेबलच्या मृतदेहासोबत सिंदूर विखुरलेला आढळून आला. पाटना जंक्शनला लागून असलेल्या वीणा सिनेमागृहाजवळ हॉटेल मीनाक्षी आहे. यात खोली क्रंमाक 303 मध्ये ही हत्या करण्यात आली आहे.
खोली गजेंद्रच्या नावावर बुक होती. गजेंद्रनेच महिलेचा खून केला आहे अशी चर्चा परिसरात रंगली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी येण्याच्या आधीच आरोपी फरार झाला होता. गुरुवारी आरोपी हॉटेल मध्ये आला. शुक्रवारच्या सकाळी महिला आरोपीला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये आली होती. शोभा असं या महिलेचे नाव होते.
पोलिस या घटनेअंतर्गत तपास करत आहे. महिला आरोपीला का भेटायला आली याचे उत्तर अद्याप स्पष्ट झाले नाही सोबत आरोपीने तीची हत्या का केली? याचे उत्तर सुध्दा मिळाले नाही. त्यामुळे पोलिसांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.