Drinking | representative pic- (photo credit -pixabay)

Bihar News: विद्येच्या माहेर घरात मद्यपान करताना शिक्षकासहीत मुख्यध्यापक रंगेहात पकडले गेले आहे. उत्तर प्रदेशातील बिहार जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बिहारमध्ये दारूबंदी असताना, सरकारी शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकाने आवाराला पबमध्ये रुपांतर करत असल्याचे चित्र दिसत आहे. दारूबंदी असताना, शाळेच्या आवारात मद्यपान केल्याचे माहिती मिळाली आहे. बिहारमधील सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच दारू न पिण्याची जाहीर शपथ घेतली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनावर प्रश्न चिन्ह उभारला आहे. (हेही वाचा- धावत्या बसमध्ये मद्यपान, खासगी ट्राव्हल्समधील प्रवासी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर)

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बिहार मधील बांका जिल्ह्यातील राजून पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चिलकावार येथील आहे. शासकीय प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचा प्रकार आहे. सोमवारी शाळेच्या आवारातच मुख्याध्यापक, शिक्षक आणि आणखी तिघांसोबत दारून पित होते असे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती उत्पादन विभागाच्या टीमने दिली. यानंतर पथकाने घटनास्थळ गाठून मुख्याध्यापक आणि शिक्षकासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून महुआ दारू देखील जप्त केली. शाळेत एक पथक पाठवण्यात आले तेथून शासकीय प्राथमिक माध्यमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अमरेश कुमार, जगन्नाथपूर प्राथमिक शाळेचे शिक्षक बजरंगी दास, धनंजय कुमार, प्लंबर मेकॅनिक प्रदीप कुमार आणि कुमार कुमार यांचा समावेश आहे. गौरवला अटक करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.