Drinking in Running Bus: धावत्या बसमध्ये मद्यपान, खासगी ट्राव्हल्समधील प्रवासी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; बुलढाणा येथील घटना
Drinking | representative pic- (photo credit -pixabay)

Private Travels Passenger Safety Issue: खासगी ट्राव्हल्स वापरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर तर हा मुद्दा अधिक जोरकसपणे चर्चेला आला आहे. दरम्यान,आणखी एका खासगी ट्राव्हल्समधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात धावत्या बसमध्ये काही तरुण मद्यप्राशन करत असल्याचे पाहायला मिळत नाही. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. अकोला जिल्ह्यातील पातूर येथून नव्यानेच सुरु झालेल्या श्रेया ट्राव्हल्स नामक एका खासगी बसमध्ये खामगाव ते चिखली दरम्यान हा प्रकार घडल्याचे समजते. धावत्या बसमध्ये प्रवासी जर अशा प्रकारे वर्तन करत असतील तर त्यावर ट्राव्हल्स व्यवस्थापनाचा काहीच वचक नाही का? की खासगी ट्राव्हल्सची सुरक्षा रामभरोसे आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अकोला जिल्ह्यातील पातूर येथून पुण्यासाठी नुकतीच एक खासगी ट्राव्हल सुरु झाली आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, या ट्राव्हल्समधील चालकाच्या बाजूला बसून काही तरुण चालकाच्या केबिनमध्येच मद्यप्राशन करत आहे. रस्त्यावरुन धावत्या बसमध्ये असा प्रकार घडत असल्याने चालकाचे लक्ष विचलीत होण्याची शक्यता आहे. त्यातून अपघात घडून अनेकांचे प्राण टांगणीला लागू शकतात. संभाव्य धोका लक्षात घेऊन अशा प्रकारांवर तातडीने आळा घालण्याची गरज असल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त होते आहे. काही प्रवाशांनी चालकावर आणि सदर तरुणांवर कारवाईची मागणी केली आहे. (हेही वाचा, Ganpati Festival 2023 Special Trains: कोकणवासियांसाठी गणेशोत्सवादरम्यान अजून 52 नव्या फेर्‍यांची घोषणा; इथे पहा सविस्तर वेळापत्रक)

प्रवाशांमधून मागणी होत आहे की, राज्य सरकारने तातडीने खबरदारी घेऊन खासगी ट्राव्हल्सची तपासणी करावी. अनेक ट्राव्हल्स सुरक्षा नियमांना हारताळ फासतात. त्यामुळे एखादी घटना घडली तर ते प्रवाशांचया जिवावर बेतते. आरटीओकडूनही अशा वाहनांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी दुर्घटना घडते तेव्हा अनेकांचे प्राण जातात. खास करुन दीर्घ पल्ल्याच्या गाड्या अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करतात. एकाच वेळी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्याने वाहनावर गरजेपेक्षा अधिक दबाव येतो. त्यामुळे वाहनाचा तोल जाणे, चालकाचे वाहावरील नियंत्रण सुटणे असे प्रकार घडतात. काही ट्राव्हल्समध्ये तर गरेनुरुप बदल केले जातात. त्या वेळी नियम धाब्यावर बसवले जातात. त्यामुळेही अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे राज्य सरकारनेच यावर योग्य तो उपया काढावा, असे प्रवाशांचे म्हणने आहे.