Ganpati Festival 2023 Special Trains: कोकणवासियांसाठी गणेशोत्सवादरम्यान अजून 52 नव्या फेर्यांची घोषणा; इथे पहा सविस्तर वेळापत्रक
दिवा- चिपळूण विशेष- ३६ फेऱ्या आणि एलटिटी- मेंगळूरू विशेष- १६ फेऱ्या यांच्या वेळापत्रकासह मध्य रेल्वेने आज अजून 52 गाड्यांची घोषणा केली आहे.
गणेश उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमनी मुंबई, पुण्यातून कोकणात आपल्या गावी जात असतात. आरामदायी आणि किफायतशीर दरामध्ये प्रवासाचा मार्ग म्हणून अनेक जण रेल्वे प्रवास निवडतात. त्यामुळे गणपतीच्या दिवसात प्रवाशांना तिकीटं उपलब्ध व्हावीत याकरिता आता रेल्वेकडून गणपती विशेष गाड्यांच्या घोषणा आणि बुकिंग सुरू झाल्या आहेत. मध्य रेल्वे कडून यापूर्वी 156 गाड्या जाहीर झाल्या आहेत त्यामध्ये आज 52 नव्या गाड्यांची भर टाकण्यात आली आहे. दिवा- चिपळूण विशेष- ३६ फेऱ्या चालवणार आहे तर एलटिटी- मेंगळूरू विशेष- १६ फेऱ्या चालवणार आहे. 3 जुलै पासून बुकिंग सुरू होणार आहे. Ganpati Special Trains: आगामी गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून 'गणपती विशेष गाड्यांची' घोषणा; जाणून घ्या ट्रेन्स, वेळा, थांबे आणि कधी सुरु होणार बुकिंग .
पहा ट्वीट
या आधी मध्य रेल्वे ने गणेश उत्सवासाठी १५६ विशेष गाड्या जाहिर केल्या होत्या.
या मध्ये आणखी ५२ विशेष गाड्या जाहिर करत आहोत (आता एकुण १५६+५२= २०८ विशेष गाड्या)
नवीन ५२ गाड्या खालील प्रमाणे-
१) ०११५५/५६- दिवा- चिपळूण विशेष- ३६ फेऱ्या
२) ०११६५/६६- एलटिटी- मेंगळूरू विशेष- १६ फेऱ्या pic.twitter.com/xpPqJD07LP
— Central Railway (@Central_Railway) July 1, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 01, 2023 11:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

