Bihar News: बिहारमधील मुझफ्फरपूर येथे आजीने नातवाच्या प्रेमापोटी आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकलीचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह घरापासून काही अंतरावर जमिनीत पुरला. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे. चिमुकली बेपत्ता झाल्यानंतर बाळाच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत बाळाच्या आजी आणि आजोबांना अटक केली. पोलिसांनी बाळाचे मृतदेह देखील ताब्यात घेतले. (हेही वाचा- स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय, पुणे पोलिसांनी केला पदार्फाश)
खून केल्यानंतर मृतदेह जमिनीत पुरला
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील हाथोरी पोलिस स्टेशन हद्दीतील अम्मा सोहिजन गावात ही घटना घडली. मुलगी घरी न मिळल्याने मुलीच्या आईने पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर या मुलीचा खून आजी आणि आजोबांनी केल्याचे समोर आले. आजीची चौकशी केल्यानंतर मुलीचा गळा आवळून खून केल्याचे आणि तिला घरातून लांब एका ठिकाणी जमिनीत पुरले.
आईची तक्रार
मुलीच्या जन्मामुळे सासरचे लोक संतापले होते. सासून सरोज देवी आणि सासरे अशोक ओझा तिला मारहाण करून अत्याचार करायचे. मुलीची आई दुध गरम करण्यासाठी किसनमध्ये गेली होती दरम्यान मुलीच्या आजीने चिमुकलीला उचलून घराबाहेर नेलं आणि गळा दाबून खून केला असं मृत चिमुकलीच्या आईने पोलिसांंना सांगितले. मृत मुलीच्या आईच्या वक्तव्यानुसार, पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. एफआयआर नोंदवून आरोपी आजीसह आजोबाला देखील अटक केली. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे. मुलीच्या आईवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.