Arrest | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Pune Police: पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या काळा धंद्याचा पदार्फाश केला आहे.  पुण्यातील या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. पिंपरी चिंचवड येथे पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकून त्यांनी दोन पीडितांची सुखरुप सुटका केली. या प्रकरणी अद्याप अधिक तपास सुरु आहे. (हेही वाचा- दारूच्या नशेत महिलेची पार्क केलेल्या गाड्यांना मुद्दामून टक्कर मारून नासधूस;)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. आकुर्डी येथील स्पा सेंटरवर छापा टाकला. पोलिसांनी स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी आकुर्डी येथील गणेश व्हिजन मॉल येथील ब्लू स्टोन्स स्पा येथे ही कारवाई केली. पोलिसांनी राकेश शिंदे, अक्षय बनकर व एक महिला आरोपी अशा तिघांना अटक केली. तर दोन पीडित तरुणींची या व्यवसायामधून सुटका केली.

आकुर्डी येथे गणेश व्हिजन मॉल येथे ब्लू स्टोन्स या नावाने एक स्पा सेंटर चालवत होते. पोलिसांना या स्पा सेंटर मध्ये चालू असलेल्या काळे धंद्याची माहिती मिळाली. आरोपी हे पीडित तरुणांनी पैशांचे आमिष दाखवायचे आणि या स्पा सेंटरच्या नावाखाली ते त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घ्यायचे. यासंदर्भात पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधत कक्षाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करून छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकत तीन हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. या प्रकरणी अधिक तपास करत आहे.