
अंघोळीसाठी गेलेल्या 4 मुलींचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बिहारच्या (Bihar) नालंदा (Nalanda) येथील सरमेरा पोलीस ठाण्याच्या (Sarmera Police Station) हद्दीत मंगळवारी घडली आहे. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच या मुलींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने या मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
सीता कुमारी, शारदा कुमारी, राखी कुमारी आणि सोनम कुमारी या मुली काजीचक गावातील रहिवासी आहेत. या चौघीजणी मंगळवारी गावाजवळील धनावन नदीत अंघोळीसाठी गेले होते. मात्र, नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने या चौघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे, अशी माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. हे देखील वाचा-Solapur: सोलापुरात खळबळ! महिलेची हत्या करून मृतदेह फेकला झुडपात, पोलीस चौकशी सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहे. तसेच त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे.
दरम्यान, बेगूसराय जिल्ह्यात सोमवारी चार तरूण पाण्यात बुडाल्याची घटना घडली. त्यापैकी एकाला बचावण्यात स्थानिक लोकांना यश आले. मात्र, तिघे जण अजूनही बेपत्ता आहेत. ही घटना खोरमपूर पंचायतीच्या चकौर गंगाघाट येथे घडली आहे.