 
                                                                 सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) शहरात एका 40 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. या महिलेच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तिच्या मुलानेच तिची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. याप्रकरणाशी संबंधित गुन्हेगारांना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रुक्मिणी फावडे असे मृत महिलेचे नाव आहे. रुक्मिणी या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील वाणी फ्लॉट परिसरात वास्तव्यास होत्या. दरम्यान, रुक्मिणी यांचा मृतदेह त्यांच्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या झुडपात आढळून आला होता. यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. रुक्मिणी यांच्या हत्येच्या तीन दिवसानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला, असे पोलीस चौकशीतून स्पष्ट झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या घराला गेल्या तीन दिवसांपासून कुलूप आहे. तसेच त्यांचा मुलगा मागील तीन दिवसांपासून गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे संबंधित महिलेची हत्या तिच्या मुलानेच केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरातून दररोड हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. यात सोलापूर येथील घटनेने आणखी भर घातली आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
