Jail Pixabay

Bengaluru Shocker: मोबाईल फोनवर वाजणाऱ्या गाण्याच्या आवाजावरून जोडप्यात झालेल्या वादानंतर पतीने पत्नीवर टॉयलेट क्लीनर अ‍ॅसिड (Acid Attcak )ओतल्याचा महिलेने आरोप आहे. ही घटना 19 मे रोजी उत्तर बेंगळुरूमधील सिदेदहल्ली येथील एनएमएच लेआउट येथे घडली. पत्नी कामावरून आली होती. तेव्हा पतीने तिच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. दारूपिण्यासाठी पैसे देण्यास पतीने नकार दिला. त्यानंतर तो तिला त्रास देत होता. अखेर पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने त्याला पैसे दिले.

त्या पैशांची दारू आणूण पती पीत असताना त्याने मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणी सुरू ठेवली. त्यावर पत्नीने आवाज कमी करण्यास सांगितला. तेव्हा पतीने रागाच्याभरात पत्नीवर टॉयलेट क्लीनर अ‍ॅसिड ओतले. त्यामुळे पीडित महिलेच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर दुखापत झाली. 44 वर्षीय महिलेची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. ती येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पेशाने ब्युटीशियन असलेल्या महिलेने रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तिच्या पतीने तिच्याकडे दारू खरेदी करण्यासाठी पैसे मागितल्याचा सांगितले. तिने नकार दिल्यावर तो तिला त्रास देऊ लागला. अखेर तिने त्याला पैसे दिले. नंतर, तो दारू पिऊन घरी आला आणि त्याच्या मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी वाजवू लागला. तिने त्याला तो कमी ठेवण्याची विनंती केली तेव्हा त्याने नकार दिला.

यामुळे जोडप्यात वाद झाला. त्यानंतर त्याने बाथरूममधून टॉयलेट अ‍ॅसिड क्लिनरची बाटली आणली आणि ती तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर ओतली, असे त्याने सांगितले. तिने मदतीसाठी ओरडताच तो तेथून पळून गेला, असे पोलिसांनी सांगितले. शेजाऱ्यांनी पीडितेला तातडीने रुग्णालयात नेले.