Bengaluru News: लिव्ह-इन पार्टनरच्या (Live In Patner) छातीत चाकूने वार करून त्याची हत्या करणाऱ्या महिलेला पोलीसांनी अटक केले आहे. आरोपी महिलेने पोलिसांना (Police) सांगितले की, तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना 5 सप्टेंबर रोजी हुलीमावू पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपी महिलेचे नाव रेणुका (24) असून ती कर्नाटकातील बेलगावीची आहे आणि मृत जावेद (29) ही केरळमधील कन्नूरची आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
रेणुकाला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर ती अपार्टमेंटमध्ये परतली आणि पळून जाण्याचा विचार करत होती, असेही पोलिसांनी उघड केले. अपार्टमेंटमधील सुरक्षारक्षकाने दरवाजा बाहेरून बंद करून पोलिसांना कळवले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला कॉलेजमधून नुकतीच पास झाली होती आणि एक सहा वर्षांच्या मुलीची आई होती. तिला नोकरी नव्हती आणि ती अविवाहित पुरुषांसोबत पबमध्ये गेली आणि त्यांच्यासोबत जवळीक साधायची.तीला ऐसोआरामाची जीवन जगायचे होते अस पोलीस ठाण्यात कबुल केल.
माडीवाला येथे मोबाईल दुरुस्त करणारा जावेद आरोपी महिलेच्या संपर्कात आला. ते तीन वर्षे एकत्र राहत होते आणि अलीकडेच अक्षया नगर येथील एका अपार्टमेंटमध्ये राहायला गेले. दोघांमध्ये अनेकदा भांडण झाले आणि मंगळवारी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून मोठे भांडण झाले. रागाच्या भरात रेणुकाने जावेदच्या छातीवर चाकूने वार केले. नंतर, तिने त्याला रुग्णालयात नेले, परंतु रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अपार्टमेंट मालक गणेश यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. ती इमारतीतून पळ काढण्याच्या मार्गावर असताना तीला पकडण्यात यश आले. रेणुकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई सुरू केली आहे.