Madhya Pradesh Fire: मध्य प्रदेशातील भोपाळ (Bhopal) येथील अरेरा कॉलनी भागात असलेल्या एका खाजगी बॅंकेला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना गुरुवारीच्या मध्यरात्री घडून आली. आगीत 3 लाख रुपयांचे सामना जळून खाक झाले असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. आगीची माहिती मिळताच, हबीबगंज पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. हेही वाचा- गोकुळपुर मेट्रो स्टेशनवरील स्लॅब कोसळला, घटनेत चार लोक जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, बॅंकेत पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. रत्यावरून जाणाऱ्या लोकांना बॅंकेच्या इमारतीतून धूर निघताना दिसले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना आणि अग्निशमन दलाला दिली. तात्काळ आयएसबीटीच्या चार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे काम सुरु केले. रात्रीच्या वेळीस बॅंकेत कोणीही नसल्याने जीवीतहानी टळली.
बॅंकेचे व्यवस्थापक निरंजन सिंग घटनास्थळी धाव घेतले. आग विझवण्याचे काम सुरु होते. जवळपास दीड तास आग विझवण्यासाठी लागला. बॅंकेच्या आत ठेवलेले फर्निचर आगीत जळून खार झाले. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजले नाही आणि या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आगीच्या घटनेनंतर बराच वेळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.