Kanpur Kalindi Express Accident: उत्तर प्रदेशची राजधानी कानपूर (Kanpur) येथे रेल्वेचा मोठा अपघात होण्यापासून टळला. रविवारी रात्री अनवरगंज-कासगंज मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलेंडर ठेवण्यात आले होते. त्याला कालिंदी एक्स्प्रेसची (Kalindi Express) धडक बसली. यामुळे सिलेंडर लांब जाऊन पडले. या घटनेमुळे प्रवासी लोक घाबरले. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. लोकोपायलटने सिलिंडर पाहून रेल्वे थांबवली. मात्यार, सिलिंडरची धडक झालीच, घटनेनंतर रेल्वेच्या सर्व अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने ट्रॅकपासून काही अंतरावर सिलेंडरचे अवशेष आढळले. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन उलटवण्याचा कट आखत सिलिंडर रेल्वे रुळांवर ठेवण्यात आला होता. (हेही वाचा: Surat: सुरत येथील गणेश बाप्पाच्या मंडळावर दगडफेक, संतापलेल्या भाविकांकडून वाहनांची तोडफोड)
कानपूरमध्ये कालिंदी एक्स्प्रेस उलटवण्याचा कट
Kalindi Express, travelling from Prayagraj to Bhiwani, was hit by a gas cylinder placed on the tracks near the crossing of Muderi village. The cylinder was thrown about 50 meters away due to the impact of the collision.
The incident happened at nearly 8 pm on Sunday.
There… pic.twitter.com/fPQ3jInZs6
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) September 9, 2024
अपघातानंतर सुमारे अर्धा तास ट्रेन उभी होती. याशिवाय लखनऊहून वांद्रे टर्मिनसकडे जाणारी लखनऊ-वांद्रे एक्स्प्रेसही बिल्हौर स्थानकावर थांबवण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेले अधिकारी राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, आरपीएफने रेल्वे ट्रॅकवर ठेवलेला सिलेंडर जप्त केला आहे. ट्रेनला धडकल्याने सिलिंडरचा वरचा भाग खराब झाला. ट्रेनचा वेग जास्त असता तर सिलिंडरचा स्फोट होऊ शकला असता. कन्नौज रेल्वे पोलीसही घटनास्थळाचा तपास करत आहेत.