Madhya Pradesh Crime: मल्हारगंज येथील भरचौकात बहिणीवर आणि मुलावर तलवारीने वार, घटना सीसीटीव्हीत कैद
MP Crime Video PC Twitter

Madhya Pradesh Crime:  मध्य प्रदेशातील जवाहर रोडवरील मल्हारगंज चौकात रविवारी दुपारी एकाने व्यक्तीने आपल्या आणि बहिणीवर आणि तिच्या मुलावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. शहरातील गजबजलेल्या चौकात ही घटना घडली. या भयानक असलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याआधारे आरोपी भावावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. घटनास्थळावरून आरोपी फरार आहे.( हेही वाचा-  भिवंडीत नकली बंदुकीने दहशत माजवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, बंदूकही जप्त)

मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारगंज भागात आरोपी भाऊ आणि पीडित बहिण दोघांमध्ये पार्किंगवरून वाद झाला होता. हा वाद सुरु असताना भावाने तलवार काढली आणि बहिणीच्या मुलावर आणि बहिणीवर वार केला. आरोपीने बहिणीच्या मुलावर वार केला मात्र सुदैवाने तो बचावला, या घटनेनंतर स्थानिक लोक घटनास्थळी आले. आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली परंतु आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. नितेश असं आरोपीचे नाव आहे.

या घटनेमुळे चौकाचौकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसठाण्यात पीडित महिलेने नितेश विरुध्दात गुन्हा दाखल केला. पीडित या हल्ल्यात जखमी झाल्याने तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीच्यावर उपचार सुरु आहे. सीसीटीव्हीचे फुटेज पोलिस तपासत आहे. पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.  पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.