Assam News: आसाम (Assam) मधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आसाममधील सिलचर येथील भाजप खासदार राजदीप रॉय यांच्या घरी शनिवारी एका 10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कचारचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) सुब्रत सेन यांनी वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण एका बेडरूममध्ये गळ्यात कपड्याने लटकलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलाची आई दोन वर्षांपासून भाजप नेत्याच्या घरात घरगुती काम करत होती. ही महिला मूळची ढोलाई परिसरातील आहे. स्थानिक पोलिसांनी तातडीने मुलाच्या मृत्यूच्या परिस्थितीचा तपास सुरू केला. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह सिलचर वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे घोषित केले आहे.
पोलीसांनी पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसर हादरलं आहे. खासदार राजदिप रॉय यांनी शाळेत वैयक्तिक पुढाकाराने मुलाला शाळेत पाठवले. जवळच्या इमारतीत कुटूंबासोबत राहत हा मुलगा राहत होता. राजपूर रॉय घरी येताच, त्यांनी एका रुममध्ये प्रवेश केला अचानक त्यांना मुलगा लटकलेल्या अवस्थेत दिसला. पोलीसांना या घटनेची कल्पना दिली.आणि मुलाला रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.