Andra Pradesh News: आंध्र प्रदेशातील (Andra Pradesh ) नरसरावपेट परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात गणपती विसर्जन कार्यक्रमादरम्यान जोरदार विजेचा झटका लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विजेच्या खांबाच्या संपर्कात आल्यानंतर एका व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून सत्तेनापल्ली रोडवर हा माणूस विद्युत खांबाच्या संपर्कात आला. विजेच्या खांबाजवळ उभारलेल्या स्टेजवर तो माणूस उभा होता. हा माणूस खांबाच्या संपर्कात आला आणि विजेचा धक्का लागल्याने तो खांबाला अडकला. सदर व्यक्ती पोलच्या संपर्कात आल्यानंतर त्याला पाहून घटनास्थळी उपस्थित लोक घाबरले.
जमावानी तरुणांना विद्युत खांबापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला. ती व्यक्ती काही वेळ विजेच्या खांबाला अडकली होती त्यानंतर एक व्यक्ती बांबू घेऊन आला. त्याने त्या व्यक्तीला बांबूने ढकलले आणि त्यानंतर तो स्टेजवरून खाली पडला. इलेक्ट्रोइक पोलपासून तो माणूस वेगळा झाल्यानंतर जमावाने त्याच्याकडे धाव घेतली. त्यांनी त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात नेले जेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे.