Pune Short Circuit News: गणपतीसाठी सजवलेल्या घरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत तरुणाने गमावला जीव, पुण्यातील धक्कादायक घटना
पुण्यातील खेड तालूक्यात गणपतीच्या लायटींग आणि डेकोरेशनमुळे एका तरुणाने जीव गमावला आहे.
Pune Short Circuit News: पुण्यातील खेड तालूक्यात गणपतीच्या लायटींग आणि डेकोरेशनमुळे एका तरुणाने जीव गमावला आहे. या धक्कादायक घटनेमुळे पुण्यात शहर हादरले आहे. ही घटना खरपुडी बुद्रुक येथे घडली आहे. घरात केलेल्या डेकोरेशन आणि लायटिंगमुळे जळून मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकऱणात पुण्यातील खेड पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गणपतीच्या शुभ दिवशी पुण्यात मोठी घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील खरापुडी बुद्रुक येथील दत्तनगर येथील रहिवासी होता. वैभव गरूड असं मृत झालेल्या व्यक्तीचे नाव होते. पोलीसांनी या घटनेची नोंद घेत आकस्मित मृत्यूती नोंद घेतली आहे, वैभव याचा घरात गणपती बसवला होता. या साठी त्याने घरात आकर्षक असं डेकोरेशन आणि लायटींगचा वापर करत घर सजवलं. मात्र रविवारी एक दुर्घटना घडली. घरात शॉर्ट सर्किटमुळे अचनाक आग लागली.
या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. वैभव घरात बेडवर झोपला होता त्यामुळे त्याला आगीची माहिती मिळाली नाही. जवळच्या बेडने देखील अचनाक पेट घेतला आणि या आगीत त्याने स्व:ताचा जीव गमावला. स्व:ताला वाचवण्याचा प्रयत्न केला पंरतु त्याला तेथून वाचता आले नाही. ऐन सणासुदीच्या वेळी ही घटना घडली त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. वैभला दोन लहान मुली आहेत. त्याच्यावर दुखाचे डोंगर कोसळले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2023 01:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

