Attack | Representational image (Photo Credits: pxhere)

Pune Crime News: पुण्यात (Pune) एका तरुण मुलाने आपल्या आईला आणि बहिणीला चाकू खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत त्या दोघीं जखमी झाल्या आहेत. दोघींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पुण्यातीली काळेपडळ येथील बिनावत टाऊनशिप सोसाटीत ही घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी राहत्या घरी मुलाने हे कृत्य केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी (Police) आरोपी मुलाला अटक केले आहे. त्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी बहिणीने पोलीसांत फिर्याद दिल्याप्रमाणे आरेपी भावाने दोघांवर चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी फिर्यादी रुबिना हिच्या तक्रारानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलगा साजिद युसुफ पठाण हा बेरोजगार आहे. काहीच कामधंदा करत नसल्यामुळे घरात नेहमी भांडण होत असे. आई त्याला रोज कामावर जा असं सांगायची पंरतु त्याने कोणाचेही ऐकले नाही, अशी तक्रार फिर्यादीने दिली. शनिवारी रुबिनाने त्याच्याकडे गाडीचे लाईसन्स बद्दल विचारणा केली असताना त्याला राग आला.

त्याने रागाच्या भरात चाकू घेवून रुबिनाच्या पोटात खुपसला. तीचा आरडाओरड ऐकताच आई बाहेर आली. आरोपीच्या समजवण्यासाठी जाताच, तीच्या ही पोटात चाकू खुपसला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले.स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुणे पोलीसांनी रुबिनाची फिर्याद लिहून घेतल्यानंतर आरोपी मुलाला अटक केली.