Cock | (Photo Credits: pixabay)

Madhya Pradesh: एक काळ असा होता की, पहाटेच्या वेळी कोंबडा आरवल्यानंतर लोक उठायचे. लवकरच अलार्मच्या घड्याळांनी कोंबड्याची जागा घेतली. आणि ते मानवांसाठी अधिक सोयीचे बनले. कोंबड्यासंबंधी एका प्रकरणात, इंदूरमधील एका डॉक्टरने शेजाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे कारण त्याचा कोंबडा सकाळी आरवतो आणि त्यामुळे डॉक्टरची झोपमोड होते. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर आणि त्यांचे शेजारी इंदूर शहरातील पलासिया भागातील रहिवासी आहेत. मात्र, शेजाऱ्याचा कोंबडा रोज पहाटे आरवतो म्हणून डॉक्टर चांगलाच संतापला आहे. पोलिसांनी आधी दोन्ही पक्षांशी बोलण्याचा प्रयत्न केला असून प्रकरण न सुटल्यास कायदेशीर कारवाई करू, असे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार डॉक्टर आलोक मोदी यांनी असेही म्हटले आहे की, त्या व्यक्तीने चार कुत्रे पाळले आहेत जे नेहमी भुंकतात.

 फिर्यादी आलोक मोदी यांनी पुढे सांगितले की,मी उशीरा घरी येतो, त्यामुळे उशिरा झोपतो. कोंबडा पहाटेच आरवायला लागतो त्यामुळे मी चिडतो. पोलिसांनी सांगितले की, ते लवकरच दोन्ही पक्षांशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढतील. "समस्या कायम राहिल्यास, फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम 133 अंतर्गत कारवाई केली जाईल," असे पोलिसाने सांगितले.