भारतात टिक-टॉकने (TikTok) खूप प्रसिद्ध मिळवली आहे. लहानपासून ते वृद्धांमध्येही टिक-टॉकचे वेड पाहायला मिळत आहे. मात्र, याच टिक-टॉक ऍपमुळे अनेकांनी आत्महत्या केल्याची बातम्या सतत आपल्या कानावर पडत आहेत. यातच आंध्र प्रदेश (Andra Pradesh) येथील एका घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आंध्र प्रदेश येथी विजयवाडा (Vijayawada) परिसरात एक महिला सतत टिक-टॉकवर वेळ घालवायची. यावर संतापून तिच्या पतीने तिला सुनावले. पतीचे बोलणे मनाला लागल्यामुळे संबंधित महिलेने आत्महत्या केली. त्यानंतर आई सोडून गेल्याचा विरह सहन न झाल्याने मुलानेही सायनाइड प्राशन करुन आपले जीवन संपवले, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
सोशल मीडिया हे काही जणांसाठी एखाद्या व्यसनाप्रमाणे आहे. दिवसभर ते सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या व्यावसायिक आणि वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होतात. यातच आंध्र प्रदेश येथी घडलेल्या घटनेने यात आणखी भर घातली आहे. पत्नी सतत टिक-टॉकवर व्हिडीओ बनवायची. तिच्या या सवयीला कंटाळलेल्या नवऱ्याने तिला यावरुन सुनावले. त्यामुळे चिडलेल्या पत्नीने सायनाइड प्राशन केले. सोने पॉलिश करण्यासाठी सायनाइडची बाटली घरी आणली होती. आईला मृतावस्थेत पाहिल्यानंतर मुलाने सुद्धा त्याच बाटलीतील सायनाइड प्राशन केले. त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. हे देखील वाचा-आई-मुलाच्या नात्याला काळिमा; 50 वर्षीय व्यक्तीने आईचे नग्न फोटो पाठवले नातेवाईकांच्या WhatsApp ग्रुपवर, प्रॉपर्टीसाठी करत होता ब्लॅकमेल
टाऊन पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन सुरु असल्याने मृत महिलेच्या पतीची नोकरी गेली होती. दोन महिन्यापूर्वी या कुटुंबाचा कार अपघात झाला होता. ज्यामध्ये चार ते पाच लाख रुपये खर्च झाले होते. वैद्यकीय खर्चासाठी कुटुंबाने कर्ज काढले होते. मात्र, त्याची पत्नी सतत टिक-टॉकवर व्यस्त असायची. यामुळे त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. यातूनच ही घटना घडली आहे.