अज्ञात व्यक्तीने पॉर्न वेबसाईवर टाकला एका तरुणीचा मोबाईल क्रमांक; पोलिसात गुन्हा दाखल
(Photo Credits: Pixabay)

एका अज्ञात व्यक्तीने पार्न वेबसाईटवर (Porn Website) तरुणीचा मोबाईल क्रमांक टाकल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चंदीगड येथे घडली आहे. पीडित तरुणी ही महाविद्यालयात शिक्षण घेत असून गेल्या अनेक दिवसांपासून तिला मॅसेज आणि फोन येते होते. एवढेच नव्हे तर, या तरुणीच्या व्हॉट्सअप अकाऊंटवर अनोळखी लोकांचे अश्लील मॅसेज तसेच व्हिडिओ कॉल येत होते. यामुळे तरुणी हैराण झाली आणि तिने जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात माहिती दिली. एका अज्ञात व्यक्तीने या तरुणीचा मोबाईल क्रमांक पॉर्न वेबसाईटवर टाकला आहे. यामुळे संबधित तरुणीला अश्लील मॅसेज आणि व्हिडिओ कॉल येत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी एका संशयिताला लवकरच अटक कली जाणार असून त्याची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडित तरुणी विद्यार्थीनी आहे. तसेच गेल्या काही महिन्यापूर्वी पीडित तरुणीचा नंबर पॉर्न वेबसाईटर पोस्ट करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, तरुणीला तिच्या व्हाट्सअप अकांऊटवर ५० ते ६० लोकांनी व्हिडिओ कॉल आणि अश्लील मॅसेज केले होते. तरुणीने याबाबत अधिक चौकशी केली असता कोणीतरी तिचा मोबाईल नंबर क्रमांक पार्न वेबसाईटवर टाकला असल्याची माहिती स्वत: पीडित तरुणीने पोलिसांना दिली. याप्रकरणी स्थानिक पोलिसात गुन्हा नोंदवला असून एका संशयिताला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे देखील वाचा-मुंबई: रेल्वे प्रवाशांवर हल्ला करणारे 6 जण पोलिसांच्या ताब्यात

सायबर क्राईमच्या अनेक बातम्या नेहमी आपल्या कानावर पडत असतात. भारतात सायबर क्राईमसारख्या घटना अधिकच वाढत जात आहेत. तसेच यांसारखे गुन्हे कायमचे नष्ट व्हावे, यासाठी सायबर क्राईम प्रयत्न करत आहेत.