हार्बर लाईन (Harbour Line) मार्गावरील टिळकनगर (Lokmanya Tilak Nagar) ते कुर्ला स्थानक (Kurla) दरम्यान प्रवाशांना मारहाण आणि चोरी केल्याप्रकरणी 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बिहार येथून आलेल्या तिघा भावंडांनी टिळक नगर येथून सीएसएमटी जाणारी लोकल पकडली होती. यावेळी या प्रवाशांचे एका आरोपीने पाकीट मारले. याला प्रवाशांनी विरोध केल्यामुळे आरोपीने त्याच्या 5 साथीदारासह प्रवाशांवर हल्ला केला. कुर्ला स्थानक जवळ आल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी रेल्वे स्थानकांवर ऑन ड्युटी असेलेल्या रेल्वे पोलिसांनी आरोपीला पकडून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
रेहमुल अब्दुल रहेमान शेख हा शुक्रवारी त्याच्या दोन भावांसोबत टिळकनगर ते सीएसएमटी दरम्यान प्रवास करीत होती. प्रवास करताना आरोपी जुमून मूर्तजा सलमानी याने रेहमुल याचे पाकिट चोरले हे रेहमूलच्या भावांच्या लक्षात आले. त्यामुळे फिर्यादींनी आरोपीला जाब विचारला. यानंतर आरोपी मुर्तजा याने त्याच्या 5 साथीदारांसह रेहमूल आणि त्याच्या भावावर हल्ला चढवला. दरम्या, आरोपींनी रेहमूलच्या एका भावावर ब्लेडने हल्ला केला तर, एकाला धावत्या रेल्वेमधून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. कुर्ला स्थानकाच्या जवळ आल्यावर फिर्यादीने आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यावेळी स्थानकांवर कार्यरत असलेले पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना पकडून ताब्यात घेतले. हे देखील वाचा- पुणे: 21 वर्षीय तरुणीचे अर्धनग्न फोटो फेसबुकवर केले शेअर; आरोपीवर गुन्हा दाखल
आरोपीला पोलीस स्थानकात घेऊन गेल्यानंतर त्यांची अंगझडती केली. त्यानंतर आरोपींकडून चार हजार रोख रक्कम आणि चांदीची चैन मिळाली. पकडलेल्या आरोपींपैकी ४ आरोपी हे अल्पवयीन आहेत. तसेच सर्व आरोपी गोवंडी परिसरातील रहवासी आहेत.