पुणे: 21 वर्षीय तरुणीचे अर्धनग्न फोटो फेसबुकवर केले शेअर; आरोपीवर गुन्हा दाखल

एका 21 वर्षीय तरुणीचे अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा प्रकार पुणे (Pune) येथील पिंपरी (Pimpri) तालुक्यात घडला. पीडित तरुणीने यासंदर्भात चाकण पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने 4 नोव्हेंबर 2018 रोजी फेसबूकवर बनावट खाते उघडले होते. परंतु, त्याच खात्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीला तिचे फेसबूकवर अर्धनग्न फोटो आढळून आले. त्यानंतर तरुणीने स्थानिक पोलिसात जाऊन हा सर्व प्रकार सांगितला. आरोपी हा पीडतला ओळखत असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहे.

आरोपी संदर्भात इतर कोणतीही माहिती मिळाली नसून सुनील बांबू असे या आरोपीचे नाव आहे. याने फेसबूकवर बनावट खाते उघडून त्यावर संबधित तरुणीचे फोटो अपलोड केले. धक्कादायक म्हणजे, गेल्या एक वर्षापासून पीडित तरुणीचा अर्धनग्न फोटो फेसबूकवर अपलोड झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने फेसबूकवर बनावट खाते उघडले होते. तसेच बदमानी करण्यासाठी आरोपीने कव्हर फोटो म्हणून पीडिताचे अर्धनग्न फोटो अपलोड केले. ज्यावेळी पीडित फेसबुकचा वापर करत होती. त्यावेळी तरूणीला तिचा अर्धनग्न फोटो आढळून आला. त्यानंतर तरुणीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी सुनील याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुासर गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर सुनील याच्याकडे तरुणीचा फोटो कसा आला? याची चौकशी करत आहेत. हे देखील वाचा- मुंबई: पार्टीनंतर मैत्रीणीवर बलात्कार करणाऱ्या मित्राला पोलिसांकडून अटक

गेल्या दोन दिवसापूर्वी एका तरुणीने चक्क तिच्या प्रियकराला आपल्या बहिणीचे नग्न फोटो पाठवल होते. यामुळे त्यांच्या कुटुबियांतील सदस्यांना मोठा धक्का लागला होता. सध्या अशाप्रकारच्या घटना अधिकच वाढल्या असून यावर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत.