मुंबई: पार्टीनंतर मैत्रीणीवर बलात्कार करणाऱ्या मित्राला पोलिसांकडून अटक
Women Harassment( FIle photo)

पार्टीसाठी गेलेल्या मैत्रीणीवर बलात्कार (Rape Case) करणाऱ्या नराधमाला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली आहे. ही धक्कादायक घटना विक्रोळी (Vikhroli) येथील परिसरात घडली आहे. पार्टीनंतर तिच्यासोबत घडलेल्या हा प्रकार पीडित तरुणीने तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर पीडिताच्या कुटुंबियांनी मालाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पार्कसाईट पोलिसांनी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. तसेच पार्टीला उपस्थित असलेल्या इतर मित्रांचीही चौकशी केली जात आहे.

पीडित तरुणी (35) मालाड येथील रहवासी असून शनिवारी ती पार्टीसाठी विक्रोळी येथे आली होती. त्यावेळी पार्कसाइट येथील वाधवा टॉवरमधील एका फ्लॅटमध्ये पीडितच्या 4 तरुणांनी एक पार्टी आयोजित केली होती. पार्टीकरुन घरी पोहचल्यानंतर पीडितने तिच्या कुटुंबियांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी वेळ न घालवता स्था निक पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीची तक्रार दाखल केली. बलात्काराचे गंभीर प्रकरण असल्याने स्थानिक पोलिसांनी पार्कसाईट पोलीस ठाण्याला या संदर्भात कळवले. पार्कसाई़ट पोलिसांनी याची दखल घेत पुढील तपासाला सुरुवात करुन या प्रकरणातील आरोपी तरुणीला अटक केली. हे देखील वाचा- लज्जास्पद! पहिल्या पतीने आपल्या साथीदारांसह महिलेवर केला सामूहिक बलात्कार; गुप्तांगावर दिले सिगारेटचे चटके

ज्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला तेव्हा दुसरे मित्र काय करत होते. याची पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे. सध्या बलात्काराचे प्रकरण वाढत जात असल्याने पालक वर्गामध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.