Bihar Miracle: आश्चर्यकारक प्रकार, मृत महिला 18 तासांनी जिवंत झाली, डॉक्टरही हैराण
Bihar

Bihar Miracle: आता पर्यंत क्वचित असं घडलं आहे, की मृत्यूनंतर माणूस जिवंत झाला आहे. असाच आश्चर्यकारक प्रकार छत्तीसगड (Chhatishgarh) येथील आहे. राज्यातील गढवा जिल्ह्यात एक वृध्द महिलेचा मृत्यू झाला होता. 18 तासानंतर महिला जिवंत झाल्याची माहिती मिळाली. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात. (हेही वाचा- दोन वर्षांपूर्वी 2 मुली गमवल्या, त्याच दिवशी माता-पित्यांनी दिला जुळ्या मुलींना जन्म)

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड येथील वृध्द महिला मरण पावली होती. रामवती देवी असं मृत या महिलेचे नाव असून ती मुळची बेगुसरायच्या नीमा चंदापूरा गावातील आहे. रामवती यांना ११ फेब्रुवारी रोजी महिलेने श्वास घेण्यास त्रास होत होता. तिला छत्तीसगड येथील कोरवा जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथील डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिला मृत घोषित केले. दरम्यान तिच्या मुलांनी तीला मूळ गावी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आणि १२ फेब्रुवारी रोजी खासगी वाहनातून मृतदेह बेगुसराय येथे आणत होते.

१८ तासांहून अधिक प्रवास करून ते बिहारच्या औरगाबादला पोहोचले तेव्हा अचानक रामवती देवी या शुध्दीवर आल्या. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात डॉक्टांरांनी त्यांना व्हेटिलेटरवर ठेवलं. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं डॉक्टरांनी माहिती दिली.

रामवती कशी जिंवत झाली?

१८ तासांनतंर रामवती यांच्या शरिरात हालचाल जाणवली. हे चमत्कारापेक्षा कमी नाही असं डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी असा अंदाज वर्चवला आहे की, रामवती यांना ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत घोषित केले. वाहनात बसलेल्या झटक्यांमुळे ती पुन्हा जीवंत झाल्याचं म्हणत आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.