amarnath yatra -Representational image. PTI

Amarnath Yatra 2023: दरवर्षी बड्या  उत्साहाने अमरनाथ यात्रेची तयारी चालू असते. यंदा प्रशासनाकडून यात्रेकरुंसाठी 100 खाटाचं दोन रुग्णालय उभारण्यात आल आहे.  यात्रेकरुंसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जम्मू आणि कश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या हस्ते ह्या दोन रुग्णालयाचे उद्दाटन करण्यात आले आहे. भाविकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी 100 खाटाचे दोन रुग्णालय बांधण्यात आले. DRDO च्या मदतीने बांधलेले हे रुग्णालय भाविकांना संभाव्य सुविधा पुरवतील. बालघाट आणि चंदनवारी येथे हे रुग्णालय बांधण्यात आले आहे.

1 जुलै पासून अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. तर  30 ऑगस्टला ही यात्रा संपन्न होणार आहे. यात्रेकरूंच्या आरोग्य संदर्भात प्रशासन काम करत आहे.यात्रा सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहीले असताना, जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी  यात्रेकरूंसाठी  बेस रुग्णालयाचे उद्घाटन केले.

बालघाट आणि चंदनवाडी येथे दोन तात्पुरती रुग्णालये उभारण्यात आले. भाविकांची यात्रा अधिक सोयीस्कर व्हावे आणि सुलभ व्हावे ह्यासाठी प्रशासन सज्ज होते. हे रुग्णालय यात्रेकरूसाठी 24 तास सेवा देणारी आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालटाल आणि चंदनवाडी रुग्णालये अत्याधुनिक उपकरणे, डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र ब्लॉक, आयसीयू वॉर्ड, ऑक्सिजनयुक्त वॉर्ड आणि ट्रायज एरिया आणि सर्व गंभीर वैद्यकीय सेवेसाठी इतर आवश्यक साहित्याने सुसज्ज आहेत.