Ahmedabad Shocker: औषधांसाठी पैसे मागितले म्हणून पतीकडून पत्नीला बेदम मारहाण, गुन्हा दाखल
(प्रतिकात्मक प्रतिमा)

अहमदाबादच्या (Ahmedabad) वेजलपूर (Vejalpur) येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. औषधांसाठी (Medicines) पैसे मागणाऱ्या एका जेष्ठ महिलेला तिच्या पतीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, पीडित महिलेने तिच्या पतीविरोधात वेजलपूर पोलीस ठाण्यात (Vejalpur Police Station) तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी वेजलपूर पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

पीडित महिला 62 वर्षांची असून तिने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, तिने रविवारी आपल्या पतीकडे औषधांसाठी पैसे मागितले. त्यावेळी तिचा पती संतापला आणि तिला शिवीगाळ करू लागला. त्यावेळी पीडिताने आपल्या पतीला शिवीगाळ करू नका, असे सांगितल्यानंतर त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी घरात असलेल्या पीडिताच्या मुलीने तिची सुटका केली. त्यानंतर पीडिताने आपल्या मुलीसह जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली. हे देखील वाचा- Gujarat Shocker: धक्कादायक! अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत दोन नराधमांकडून वर्षभर बलात्कार, गुन्हा दाखल

पीडित महिलेचे 1981 मध्ये आरोपीशी लग्न झाले होते. आरोपी हा एका खाजगी कंपनीत कामाला असून लग्न झाल्यापासून आरोपीने पीडित महिलेचा वारंवार छळ केला आहे. घरातील कामे आणि जेवणावरून आरोपीने अनेकदा पीडित महिलेला मारहाण केली आहे. मात्र, याची वाच्यता पीडिताने कुठेही गेली नाही, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.