Gujarat Shocker: धक्कादायक! अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत दोन नराधमांकडून वर्षभर बलात्कार, गुन्हा दाखल
Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

Gujarat Shocker: गुजरात मधील मोरबी जिल्ह्यातील हलवद येथील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानुसार एका अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर दोन नराधमांनी वर्षभर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या मुलीला आम्ही तुझे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करु असे सांगून वारंवार ब्लॅकमेल केले जात होते. अल्पवयीन मुलगी ही 12 वी मध्ये शिकणारी आहे.(Uttar Pradesh: उत्तर प्रदेशच्या राजेंद्र नगर परिसरात शिक्षकाची हत्या, विद्यार्थ्यांवर संशय)

जयेश कंजेरिया आणि मेहुल हडीयाळ अशी आरोपींची नावे आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने असे म्हटले की, कंजेरियाने अल्पवयीन मुलीसोबत प्रथम मैत्री केली आणि तिला भेटण्यास सुरुवात केली. नंतर हडीयाळ सुद्धा त्यामध्ये सहभागी झाला. हडीयाळ याने मुलीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ काढले. आरोपीने नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच मागणी पूर्ण न केल्यास तिचे खासगी फोटो आणि भावाला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली.

या सर्व प्रकारामुळे पीडिता गेल्या काही दिवसांपासून तणावात आणि घरात एकदम शांत शांत असायची. तिच्या अशा वागण्यामुळे घरातील मंडळींनी तिला विचारले. तेव्हा तिने तिच्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Uttar Pradesh Crime: यूपीमध्ये अनोखळी व्यक्तीशी बोलल्याबद्दल 35 वर्षीय महिलेला सासरच्या लोकांकडून झाडाला बांधून मारहाण)

घरातील मंडळींनी मुलीला पोलीस स्थानकात आणळले आणि तिने सांगितल्यानुसार आरोपींच्या विरोधात ब्लॅकमेल आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. परंतु पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.