Malaria Vaccine: कोरोना नंतर आता भारत मलेरियाची लस पण करणार एक्सपोर्ट, दुसऱ्या देशातील लोकांचे ही जीव वाचवनार
Malaria | Representational, Edited Image | (Photo Credits: Pixabay)

भारताच्या औषध नियामकाने स्वदेशी मलेरिया लसीच्या (Malaria Vaccine) निर्यातीला मान्यता दिली आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, भारताचे ड्रग्ज कंट्रोलर जनरल (DCGI) ने या लसीचे दोन लाख डोस यूकेला (UK) निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. ही लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या (Oxford University) शास्त्रज्ञांनी तयार केली असून सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) ती मैन्युफैक्चर केली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक प्रकाश कुमार सिंह (Prakash Singh Kumar) यांनी डीसीजीआयला लिहिलेल्या पत्रानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे. हे पत्र 27 सप्टेंबर रोजी लिहिले होते, ज्यामध्ये मलेरियाची लस देशाबाहेर निर्यात करण्याची परवानगी मागितली होती.

माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी 27 सप्टेंबर रोजी DCGI ला मलेरियाविरूद्ध लस निर्यात करण्याच्या परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की, SII ने कंपनीचे सीईओ अदार पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली मलेरियाची लस तयार केली आहे. ही भारतनिर्मित जागतिक दर्जाची मलेरियाची लस देशभरात उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत आहोत. (हे देखील वाचा: Herbal Drug BGR-34 मधुमेहासोबतच लठ्ठपणावर प्रभावी; AIIMS study चा दावा)

सध्या, जागतिक स्तरावर मलेरियाची एकच लस उपलब्ध आहे आणि जीएसके तिचे उत्पादन करत आहे. मलेरियाची लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या जेनर इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात आली होती, ज्याने 2020 मध्ये SII सह मोठ्या प्रमाणात पुरवठ्यासाठी लस तयार करण्यासाठी सहकार्य केले. नॅनोरो, बुर्किना फासो येथील 409 मुलांवर या लसीची चाचणी घेण्यात आली, ज्याच्या परिणामांनुसार मलेरियापासून 80 टक्के संरक्षण असल्याचे दिसून आले.