Cyber Attack Representational Image | (Photo Credits: PTI)

Cyber Attack On Jal Shakti Ministry: दिल्ली एम्स (AIIMS) चा सर्व्हर गेल्या आठवडाभरापासून ठप्प आहे, तो दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आणखी एक मोठा सायबर हल्ला (Cyber Attack) झाला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे (Jal Shakti Ministry) ट्विटर हँडल गुरुवारी हॅक (Twitter Handle Hacked) झाले. आयटी तज्ज्ञांनी ते पुनर्संचयित केले असले तरी सायबर हल्ल्यांच्या वाढत्या संख्येने सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून केंद्रीय यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी हॅकर्सनी मंत्रालयाच्या ट्विटर अकाउंटला लक्ष्य केले. यानंतर त्याने ग्राफिक्स पोस्ट केले, ज्यावर Join Testnets आणि sui wallet नमूद केले होते. या ट्विटद्वारे त्यांनी अनेकांना टॅग केले. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. घाईघाईत सोशल मीडिया टीमने अकाऊंट रिस्टोअर केले आणि सर्व ट्विट डिलीट केले. त्याचबरोबर मंत्रालयाची वेबसाइट आणि इतर गोष्टीही तपासण्यात आल्या, ज्या सामान्यपणे कार्यरत आहेत. हॅकर्सनी फक्त ट्विटर हँडलला टार्गेट केले. (हेही वाचा -Cyber Attacks: भारतातील शैक्षणिक संस्था आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मना सायबर हल्ल्याचा सर्वाधिक धोका; अहवालात धक्कादायक खुलासा)

AIIMS चा सर्व्हर 23 तारखेपासून डाऊन -

एम्सचा सर्व्हरही आठवडाभरापासून ठप्प आहे. 23 नोव्हेंबरला सकाळी सर्व्हर डाऊन झाला, तो दुसऱ्या दिवशीही सुरळीत न झाल्याने अधिकाऱ्यांची अवस्था बिकट झाली. यानंतर दिल्ली पोलिसांसह इतर केंद्रीय यंत्रणांना याची माहिती देण्यात आली. एम्सच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, सर्व सर्व्हर सॅनेटाइजनंतर पुनर्संचयित केले जात आहेत. (हेही वाचा - Online Fraud: निनावी कॉल्सवर PF अकाऊंट्स सह वैयक्तिक माहिती देणं टाळा; होऊ शकते मोठी फसवणूक)

याशिवाय संगणकात अँटीव्हायरसही बसवले जात आहेत. याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे. एनआयएही या प्रकरणाच्या तपासात सहभागी झाली आहे. यासोबत शत्रू देशाचा यात हात आहे का, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.