Suicide प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Kolkata Suicide Case: कोलकत्ता येथे बुधवारी एका व्यक्तीने मेट्रो समोर येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मेट्रो सेवा विस्कळीत झाली होती. कोलकत्ता रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी या संदर्भात माहिती दिली. ही घटना 9.30 च्या सुमारास घडली. ही घटना कालीकाट मेट्रो स्टेशनजवळ घडली. जखमी व्यक्तीला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा-अटल सेतू वरून उडी मारून 38 वर्षीय तरूणाने संपवलं जीवन; व्हिडिओ होतोय वायरल

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीचे 9.30 च्या दरम्यान एकाने व्यक्तीने कालीकाट मेट्रो रेल्वे स्थानकावर उडी मारून आत्महत्या केली.  आत्महत्यानंतर मेट्रो रेल्वे विस्कळीत झाली होती. या घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. SSKM रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमीची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पोलिस या प्रकरणी तपास करत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, भाईंदर येथे वडिल आणि मुलाने रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर मुंबईत शहरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. दोघे ही रेल्वे प्लॅटफॉर्मवरून खाली उतरत असल्याचे दिसत आहे. चर्चगेट रेल्वेने त्यांना धडक दिली. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतर ते कर्जबाजारी झाले होते त्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.