मुंबई आणि नवी मुंबईला जोडणार्‍या अटल सेतूवर (Atal Setu) एका 38 वर्षीय तरूणाने आत्महत्या (Suicide) केल्याचं समोर आलं आहे. गाडीमधून उतरून त्याने समुद्रात उडी घेतल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. हा युवक डोंबिवलीचा रहिवासी होता. न्हावा शेवा पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. अटल सेतूवरील ही दुसरी आत्महत्येची घटना आहे. दरम्यान अटल सेतूवर वाहनं मध्येच थांबवण्यास बंदी आहे.

अटल सेतूवरील ही आत्माहत्येची घटना 24 जुलै दुपारी 12 च्या सुमाराची आहे. सध्या या इंजिनिअर मुलाचा शोध सुरू आहे. टाटा नेक्सॉन कार मधून येऊन त्याने पूलाच्या कडेला गाडी लावली आणि गाडीतून उतरून थेट समुद्रात उडी मारली आहे. सुन्न करणार्‍या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडीयात शेअर केला जात आहे. अटल सेतू वर आत्महत्या सारखे प्रयत्न रोखण्यासाठीच काही ठिकाणी पुलाच्या कडेला पत्रे लावण्यात आले आहेत.

अटल सेतू वर तरूणाची आत्महत्या  

 

20 मार्चला ठाण्याच्या एका महिला डॉक्टरने देखील अशाच प्रकारे समुद्रात उडी टाकली होती. 43 वर्षीय या महिलेने सुसाईड नोट ठेवली होती. नैराश्यामधून तिने हे पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात आलं होतं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)