Dog Attack PC TW

VIDEO: भटक्या कुत्र्यांचा हल्ला दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात हैद्राबाद येथील एका महिलेवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना चर्चेत आहे. एका महिलेवर 15 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना चित्रापुरी हिल्स, मनीकोंडा येथे शनिवारी सकाळी 6 वाजता ही घटना घडली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, जवळपास 15 कुत्रे महिलेवर हल्ला करत आहे. घाबरलेली महिला स्वत: चे प्राण वाचवण्यासाठी ती पलटवार करताना दिसत आहे. (हेही वाचा- पिकअपच्या धडकेत झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, क्लिनरला घेतले ताब्यात, डोंबिवली येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, महिला सकाळी वॉकसाठी बाहेर पडली त्यावेळीस कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर हल्ला केला. महिलेने चप्पलने कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. महिला धीरपणे कुत्र्यांपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. संपुर्ण एक मिनीट महिला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आहे, पण तिच्या मदतीला कोणीच धावून आले नाही.

अचानक झालेल्या कुत्र्यांच्या या हल्लामुळे महिला भरपूर घाबरलेली आहे. बराच वेळ कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न करत असते. काही वेळाने ती सोसायटीच्या गेटजवळ पोहोचली आणि सुदैवाने स्कूटरवरून एक माणूस आला आणि कुत्र्यांना पळवून लावले. महिलेला मोठ्या संकटातून बाहेर काढले.  या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेनंतर महिलेच्या पतीने घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि सांगितले की, परिसरात कुत्र्यांची दहशत वाढत आहे. अलीकडे अनेक मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केला. त्यामुळे याचा इतरांना त्रास होऊ शकतो म्हणून परिसरातील कुत्र्यांना चारा देऊ नका, असे आवाहन त्यांनी सोसायटीच्या लोकांना केली.  एका वृद्ध महिलेने कुत्र्यांच्या टोळीतून वाचवली, अन्यथा ही घटना एखाद्या मुलासोबत घडली असती तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला नसता. आपल्या सभोवतालच्या प्राण्यांबद्दल आपण काळजी घेतली पाहिजे.