Dombivali Accident: पिकअपच्या धडकेत झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, क्लिनरला घेतले ताब्यात, डोंबिवली येथील घटना
Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Dombivali Accident: गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरुच आहे. आज पुन्हा डोंबिवलतील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे पिकअप चालकाने क्लिनरकडे गाडी चालवायला दिली त्यानंतर हा अपघात घडून आला. भरधाव पिकअपने सात ते आठ गाड्यांना धडक दिली. (हेही वाचा- रिक्षाच्या धडकेत 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथील खोणी पलावा परिसरात हा अपघात झाला. पिकअप वाहन चालकाने क्लिनरला दिली. क्लिनरने पिकअप वाहन रस्त्यावर आणले आणि त्यानंतर भरधाव पिकअप नियंत्रणा बाहेर गेली आणि रस्त्यावर असलेल्या सात ते आठ वाहनांना धडक दिली. या धडकेत पिकअपने झोमॅटो डिलीव्हरी बॉयला धडक दिली. पिकअपने झोमॅटो बॉयला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यात त्याचा दुर्दैवी अंत झाला.

इतका भीषण अपघात पाहून स्थानिकांना धक्काच बसला. अपघातस्थळी स्थानिकांनी गर्दी केली. या अपघातात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी मृत तरुणाची ओळख पटवली. सौरव यादव असं अपघातात मृत झालेल्याचे नाव आहे. अपघातानंतर घटनास्थळी बराच वेळ गोंधळ माजला होता. अनेकांनी पिकअप आणि क्लिनरवर संताप व्यक्त केला.

मानपाडा पोलिसांनी घटनेची माहिती नोंदवणून घेतली. पोलिसांनी क्लिनर आशिष यादववर गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यात घेतले आहे. नागरिकांनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.