Kalyan Road Accident: रिक्षाच्या धडकेत 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल
Accident PC PIXABAY

Kalyan Road Accident: ठाण्यातील भिवंडी परिसरात ऑटोरिक्षाच्या धडकेत एका 35 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना 21 जून रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव पन्नालाल पटेल असून तो भिवंडीतील भंडारी कंपाऊंड येथील रहिवासी आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा मृत्यू; शिरूरमधील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची घटना कल्याण रोड लिबर्डी रोडवर घडली आहे. ही रिक्षा धामणकर नाक्याहून कल्याण रोडच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. रिक्षाच्या धडक इतकी भीषण होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातानंतर स्थानिकांनी परिसरात गर्दी केली.  मयताचे अद्याप ओळख पटू शकले नाही.  त्यांना भिवंडीतील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

त्यानंतर रुग्णालयाने त्यांना पुढील उपचारासाठी ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर केले. तेथे उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन केले आणि मृतदेह शवागाराच्या खोलीत ठेवण्यात आला. भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (ए) आणि 279 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.