Nirav Modi (Photo Credit - ANI)

फरार हिरा व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) यांना ब्रिटिश कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. नीरव मोदी अजूनही तुरूंगात राहणार आहे. ब्रिटनच्या कोर्टाने नीरव मोदीची जामीन याचिका सातव्यांदा फेटाळली आहे. नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेच्या 14 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाची फसवणूक आणि पैशांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. नीरव मोदीला भारतकडून फरार घोषित केले गेले आहे. मागील सुनावणीत नीरव मोदी यांच्या वकिलांनी नीरवची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे कोर्टाला सांगितले होते. तो नैराश्यात आहे. भारतात पाठविल्यावर तो तेथे आत्महत्या करू शकतो. नीरवच्या वकिलांच्या या याचिकेवर ब्रिटीश कोर्टाने नीरवच्या कौटुंबिक इतिहासाविषयी माहिती मागितली होती. कोर्टाने त्यावेळी विचारले होते की, नीरवच्या कुटुंबातील किती सदस्यांनी आत्महत्या केली. (हेही वाचा -  Yes Bank बंद करणार 50 शाखा; ATM ची संख्याही होऊ शकते कमी; जाणून घ्या काय आहे यामागचं कारण)

अलीकडेच केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) नीरव मोदी प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेचे माजी उपव्यवस्थापक गोकुल नाथ शेट्टी आणि त्यांच्या पत्नीविरोधात अतिरिक्त मालमत्ता प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले आहे. शेट्टी यांच्यावर नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांना मदत केल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे.

दरम्यान, ईडीने आतापर्यंत नीरव मोदीची 329.66 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यात त्याच्या मुंबई, दुबई आणि लंडनमधील फ्लॅटचा समावेश आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने 8 जून रोजी झालेल्या सुनावणीत ईडीला नीरव मोदीची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते.