Delhi Shocker: दिल्लीतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. किराणा दुकानातून सामान खरेदी न केल्याच्या रागातून दुकानदार आणि त्यांच्या दोन मुलाने 30 वर्षीय व्यक्तीची हत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिल्ली पोलिस या प्रकरणी तपास चौकशी सुरु करत आहे. या प्रकरणातून दिल्ली पोलिसांनी तिघांना अटक केले आहे आणि सोबत हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र देखील जप्त केले आहे. (हेही वाचा- छतावर अडकलेला बॉल काढण्यासाठी गेलेल्या १० वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू, गोरेगाव परिसरात हळहळ
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील वायव्य शकरपूर येथील ही घटना आहे. विक्रम कुमार (30) असं मृताचे नाव आहे. आरोपी लोकेश गुप्ता आणि प्रियांश आणि हर्ष असं आरोपीचे नाव आहे. विक्रम गुप्ता यांच्या दुकानातून नेहमीच खरेदी करत असं परंतु महिन्याभरपूर्वी दोघांमध्ये भांडण झाले. भांडणामुळे विक्रम यांनी दुकानातून सामान खरेदी करत नसे, संतापलेल्या गुप्ताने विक्रम यांचा खुन केला. हत्येची माहिती परिसरात पसरताच, एकच खळबळ उडाली आहे.
असा केला खून
रविवारी 30 जून रोजी नेहमीप्रमाणे गुप्ता बाहेर जात होते. त्यावेळीस लोकेश गुप्ता यांनी विक्रमला दुकानात बोलावून घेतले त्यानंतर सकाळी 10 च्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा भाडंण झाले. भांडणात रागाच्या भरात लोखंडी सळी विक्रमच्या डोक्यात टाकली आणि त्यांच्या मुलांनी कात्रीने विक्रमच्या मानेवर वार केला. या जीवघेण्या हल्ल्यात विक्रम गंभीर झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे.