Goregaon Shocker: गोरेगाव परिसरातील एका मैदानात १० वर्षाच्या मुलाच्या विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. दुर्दैवाने मुलगा विजेच्या संपर्कात आला होता त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत आहे. दोषींवर कारवाई होणार असं देखील पोलिसांनी सांगितले आहे. (हेही वाचा- झोपेत चालताना तरुणाचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू; मुंबई येथील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, मीनाताई ठाकरे ग्राउंड, न्यु म्हाडा कॉलनी, गोरेगाव पूर्व येथे ही घटना घडली. आदिल चौधरी असं विजेचा धक्का लागून मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. रविवारी दुपारी आदिल मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळताना त्यांचा बॉल पोलिस चौकीच्या छतावर गेला. छतावर अडकलेला बॉल काढण्यासाठी आदिल लोंखडी सुरक्षा भिंतीवर चढत होता. त्यावेळी तो विजेच्या संपर्कात आला. लोंखडी ताऱ्यांमुळे आणि विजेचा ताऱ्यामुळे त्याला विजेचा धक्का लागला. विजेचा धक्का इतका जोराला लागला की, तो तिथेच चिपकून राहिला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दिंडोशी पोलिसांनी आदिलचा मृतदेह ताब्यात घेतल आणि पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा रुग्णालयात पाठवला. अपघाती मृत्यूचा नोंद करण्यात आला आहे. आदिलच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची जबाबदारी आणि निष्काळजीपणा दाखवणाऱ्यांवर कारवाई कऱण्यात येईल.