How India Swiggy’d In 2023: फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy ने त्यांच्या वार्षिक अहवाल 'How India Swiggy'd in 2023' मधील काही रोचक खुलासे केले आहेत. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने (Online Food Delivery Platform) गुरुवारी सांगितले की, मुंबईतील एका ग्राहकाने यावर्षी फूड ऑर्डरवर 42.3 लाख रुपये खर्च केले आहेत. चेन्नई, दिल्ली आणि हैदराबादमधील वापरकर्त्यांच्या खात्यांमधून प्लॅटफॉर्मला 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ऑर्डर्स मिळाल्या.
8 वर्षांपासून बिर्याणी देशातील लोकांची पहिली पसंती -
सलग आठव्या वर्षी स्विगीवर सर्वाधिक ऑर्डर केलेल्या डिशमध्ये बिर्याणी शीर्षस्थानी आहे. प्लॅटफॉर्मला 2023 मध्ये प्रति सेकंद बिर्याणीच्या 2.5 ऑर्डर मिळाल्या. चिकन बिर्याणीची ऑर्डर शाकाहारी बिर्याणीच्या 5.5 पट होती. स्विगीने यासंदर्भात माहिती देताना सांगितलं आहे की, प्लॅटफॉर्मवर तब्बल 40,30,827 वेळा बिर्याणी सर्च करण्यात आली आहे. प्रत्येक सहाव्या बिर्याणीची ऑर्डर हैदराबादमधून दिली जात होती. बिर्याणी ब्रिगेडचा चॅम्पियन हा शहरातील एक स्विगी वापरकर्ता होता. ज्याने यावर्षी 1,633 बिर्याणी ऑर्डर केल्या होत्या. (हेही वाचा - 3509 Condoms Ordered on Swiggy During IND vs PAK: भारत पाक सामन्या दरम्यान तब्बल '3509' कंडोमची ऑनलाईन ऑर्डर, स्विगीने केली मजेशीर पोस्ट)
तथापी, स्विगीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मुंबईतील एका वापरकर्त्याने 42.3 लाख रुपयांच्या खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली. याशिवाय रिकॅपमध्ये विविध पाककृती आणि केक, गुलाब जामुन, पिझ्झा यासारख्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डर मिळाल्या.
व्हॅलेंटाईन डेला प्रति मिनिट 271 केक ऑर्डर -
दुर्गापूजेदरम्यान गुलाब जामुनच्या 77 लाखांहून अधिक ऑर्डर्स मिळाल्या होत्या. गरब्यासोबतच नवरात्रीच्या सर्व नऊ दिवसांच्या शाकाहारी ऑर्डरमध्ये मसाला डोसा हा सर्वात आवडता होता. हैदराबादच्या एका ग्राहकाने त्यावर 6 लाख रुपये खर्च केले. याशिवाय प्रत्येकाच्या आवडत्या चॉकलेट केकसाठी 85 लाख ऑर्डर्ससह बेंगळुरूला 'केक कॅपिटल' म्हणून गौरवण्यात आले. (वाचा - ONDC Vs Swiggy and Zomato: ओएनडीसी द्वारे खाद्यपदार्थ कसे मागवाल? स्वीगी, झोमॅटोलाही बसतोय धक्का)
कंपनीने सांगितले की 2023 मध्ये व्हॅलेंटाईन डे दरम्यान, भारतात प्रति मिनिट 271 केक ऑर्डर मिळाल्या. जयपूरमधील एका वापरकर्त्याने स्विगी इंस्टामार्टवर एकाच दिवसात 67 ऑर्डर दिल्या. सर्वात मोठी सिंगल ऑर्डर 31,748 रुपयांची होती. या वापरकर्त्याने कॉफी, ज्यूस, कुकीज, नाचो आणि चिप्सची ऑर्डर दिली होती.
डिलिव्हरीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग -
या वर्षी, स्विगीच्या डिलिव्हरी भागीदारांनी इलेक्ट्रिक वाहने आणि सायकलींचा वापर करून प्रभावी 166.42 कोटी किलोमीटर कव्हर केले, ज्यामुळे पर्यावरणपूरक वितरणात योगदान देण्यात आले. चेन्नई येथील वेंकटसेन आणि कोची येथील संथिनी या डिलिव्हरी भागीदारांनी अनुक्रमे 10,360 आणि 6,253 ऑर्डर वितरित केल्या. अतिरिक्त मैल पार करून, एका स्विगी डिलिव्हरी पार्टनरने फास्ट फूड वितरीत करण्यासाठी 45.5 किमी प्रवास केला, असंही स्विगीने आपल्या अहवालात म्हटलं आहे.