Migrants in Telangana sent in special train to Jharkhand | (PC- ANI)

तेलंगणा सरकारच्या विनंतीनुसार तसेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार आज लिंगमपल्ली (Lingampalli)(हैदराबाद) ते हटिया (Hatia) (झारखंड) कडे एक-खास विशेष ट्रेन चालविली गेली. या ट्रेनमध्ये शहरात अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली. आज पहाटे 5 च्या सुमारात ही ट्रेन धावली. 24 डब्ब्याच्या ट्रेनमधून जवळजवळ 1200 लोकांना आपल्या घरी पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे विविध राज्यात अनेक मजूर अडकून पडले आहे. दरम्यान, झारंखडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अडकलेल्या कामगारांना इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी तेलंगणा सरकारला विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. त्यामुळे शुक्रवारी पहाटे ही ट्रेन सोडण्यात आली. त्यामुळे तेलंगणात लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा - Palghar Mob Lynching: पालघर मॉब लिचिंग प्रकरणी आणखी 5 जणांना अटक ; 1 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

देशातील अनेक मोठ-मोठ्या शहरात कामगार अडकून पडले आहेत. मात्र अद्याप, इतर राज्यांनी यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. महाराष्ट्रातील लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने कार्यपद्धती निश्चित केली आहे. लॉकडाऊन लागू केल्यापासून हजारो मजूर राज्यात अडकले आहेत. त्यांना त्यांच्या राज्यांत पोहोचविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.