Indore Crime: कोचिंग क्लासमध्ये 10 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, आरोपी फरार
Beating | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Indore Crime: इंदौर येथे संगणक कोंचिंग क्लासमध्ये 10 वर्षीय मुलाला मारहाण केल्याचे धक्कदायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.मुलाच्या आईने तक्रार दिल्यानंतर ही घटना समोर आली आहे. ही घटना इंदौर येथील चंदन नगर भागात घडली आहे. आरोपीने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्याने मुलाला बेदम मारहाण केली.  आरोपींनी मारहाण का केली हे अद्याप समजले नाही. (हेही वाचा-  दिल्लीच्या डाबरी येथील घरातून सापडले तीन मृतदेह,)

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी चंदन नगर भागात एका 10 वर्षाच्या मुलाला एका अज्ञात व्यक्तीने मारहाण करत त्याला शिवीगाळ केली. मुलाचा आरडाओरड ऐकत एका जवळच्या दुकानदाराने पीडीत मुलाला वाचवले. पीडीत मुलाला आईने त्याच्या कॉम्प्युटर कोचिंग क्लासमध्ये सोडलं पुढे त्याने पायऱ्यांवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला त्याच्या ओळखीबाबत विचारपूस केली. आरोपीने पीडीताला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्याने मुलाला बेदम मारहाण केली.  आरोपीच्या तावडीतून मुलगा कसा तरी पळून गेला. त्यांनी घरी पोहोचून आईला घटनेची माहिती दिली.

पीडित मुलाच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार केली. आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाला. मेहमूद असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपीची पत्नीकडून पोलिस माहिती गोळा करत आहे.