Bihar Bridge Collapsed Video: बिहारमध्ये पुन्हा एकदा मोठी घटना घडली आहे. दोन गावांना जोडणारा पूल कोसळला आहे. चार दिवसांत दुसरी घटना घडली असल्याने नागरिक चिंतेत आले आहे. काही दिवसांपूर्वीच अररियामध्ये बाकरा नदीवरील बांधकामाधीन पूल नुकताच कोसळला होता. आज शनिवारी दुपारी सिवान जिल्ह्यातील गंडक कालव्यावर दुसरा पूल अचानक कोसळला. पूल कोसळल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (हेही वाचा- अनियंत्रित कारची धडक, तीन जण जखमी, हैद्राबाद येथील घटना)
मिळालेल्या माहितीनुसार, पुल कोसळल्याने परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. सिवान जिल्ह्यातील दरोंडा ब्लॉकच्या रामगढं पंचायतमध्ये ही घटना घडली आहे. हा पूल खूप जूना होता आणि नुकत्याच कालव्याच्या बांधकामादरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे हा पूल कोसळला. जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाचे खांब कमकुवत झाले होते. शनिवारी हा पूल कोसळला. हा पूल महाराजगंज ब्लॉकमधील पाथेडी बाजार आणि दरौंडा ब्लॉकमधील रामगढा पंचायच यांना जोडणारा होता.
बिहार के सिवान में एक और पूल टूट कर गिरा,बजाओ ताली !
एक सप्ताह के अंदर ये दूसरा पूल है और साल भर का तो गिनती ही छोड़ दीजिए !
##Bihar #Pool pic.twitter.com/j3jbqQrj2b
— Mukesh singh (@Mukesh_Journo) June 22, 2024
स्थानिक रहिवाश्यांनी पूल कोसळत असल्याची घटना फोनमध्ये कैद केली. रहिवाशांनी सांगितली की, पूल पडण्यापूर्वी मोठा आवाज ऐकू आला. घरातून बाहेर पडताच पूल कोसळत असल्याचा दिसले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिकांनी सांगितले की, हा पूल दोन गावांना जोडणारा होता. पूल तुटल्याने हजोरा प्रवाशांचे वाहतुक सेवा विस्कळीत झाली आहे. लोकांच्या दैनंदिन प्रवासावर याचा परिणार होताना दिसत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नयेत अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे. रहिवाशांना आता लांबचा पल्ला गाठावला लागणार आणि प्रवाशांची गैरसोय होणार अशी चिंता व्यक्त केली जात आहे.