दिल्लीत 44 वर्षीय CRPF जवानाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू
Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

दिल्लीत (Delhi) 44 वर्षीय CRPF जवानाचा कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मृत्यू झाला आहे. या जवानाला मूत्रपिंडाचा आजार होता. आतापर्यंत केंद्रीय राखीव पोलिस दलातील 1046 जवानांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात केंद्रीय राखीव पोलिस दलाने (Central Reserve Police Force) माहिती दिली आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विरोधातील लढाईत देशातील डॉक्टर्स, वैद्यकिय कर्मचारी, पोलिस, लष्कर जवान, पत्रकार महत्त्वाचे कर्तव्य पार पाडत आहे. परंतु, हे कर्तव्य पार पाडत असताना अनेक कोरोना योद्ध्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. (हेही वाचा - Coronavirus in India: भारतात COVID-19 रुग्णांची संख्या 5 लाखांच्या पार! गेल्या 24 तासांत आढळले 18,552 नवे रुग्ण))

दरम्यान, भारतीय सीमा सुरक्षा दलात मागील 24 तासात 43 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे भारतीय सैन्य दलातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 911 वर पोहोचला आहे. आतापर्यंत BSF च्या तब्बल 633 जवानांनी कोरोनावर मात केली आहे. (हेही वाचा - Coronavirus Update: भारतीय सीमा सुरक्षा दलात 43 नवे कोरोना रुग्ण; एकुण कोरोनाबाधितांचा आकडा 911 वर)

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. भारतात शुक्रवारी दिवसभरात 18,552 रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 08 हजार 953 इतकी झाली आहे. तसेच 384 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 10,244 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.