Madhya Pradesh Crime: 17 वर्षाच्या तरुणावर चाकूने हल्ला, घटनेत दुर्दैवाने मृत्यू, मध्य प्रदेशातील घटना
Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील तराना गावात एक धक्कादायक घटना घडली. यात्रेतून घरी परतणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणावर तीन जणांनी हल्ला केला. या हल्लेत दुर्दैवाने तरुणाचा मृत्यू झाला आहे. तीन तरूणांनी चाकून हल्ला केला होता अशी माहिती समोर येत आहे. या खळबळजनक घटनेमुळे शहर हादरले आहे. तरुणांची हत्या का केली याचे नेमके कारण समोर आले नाही.त्यामुळे पोलिसांत देखील संभ्रम पसरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात एका तरुणावर तिघांनी चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळी रक्त पसरले होते. (हेही वाचा- दिल्लीच्या मुखर्जी नगर भागात भरदिवसा तरुणीवर चाकू हल्ला, आरोपी अटकेत)

पोलिसांनी या प्रकरणी तपासणी सुरु केली. पोलिसांनी सांगितले की, मृत मुलगा तिळभंडेश्वर यात्रा पाहण्यासाठी गेला होता. तेथून तो रात्री घरी परतत असताना हनुमान टेकरी तिराहा येथे तीन अज्ञांतानी त्याला अडवले. त्यांच्यात वाद घातल्यानंतर त्याला चाकून हल्ला केला. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी आले तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.

पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर आरोपीला अटक केल्याची माहिती वृत्त वाहिनींनी दिली आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी करत आहेत. तरुणाची हत्या का केली हे अद्याप समोर आले आहे. जुन्या वैमनस्यातून किंवा प्रेमप्रकरणात हा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.