महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असताना ओडिशा (Odisha) येथील घटनेने सर्वांना हादरून सोडले आहे. ओडिशा येथील केंद्रपारा (Kendrapara) जिल्ह्यात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका 87 वर्षाच्या व्यक्तीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 23 नोव्हेंबर रोजी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भारतातील अनेक राज्यात लहान मुलींचे शोषण केल्याची अनेक घटना समोर येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित आणि आरोपी एकाच गावातील रहिवाशी आहे. तसेच आरोपीचे गावात रेशन कार्डचे दुकान आहे. आरोपीने रविवारी संध्याकाळी पीडितेला चॉकलेटचे आमिष दाखवत दुकानावर घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. याबाबत पीडिताच्या आईने आरोपीला जाब विचारला. त्यावेळी आरोपी शांत राहिला. त्यावेळी या घटेनेची वाच्यात केल्यास किंवा पोलिसांत तक्रार नोंदवल्यास जीवे मारण्याचे धमकी आरोपीच्या मुलाने पीडितच्या आईला दिली. एवढेच नव्हेतर, पोलिसांत जाता यावा नाही म्हणून त्याने पीडिताच्या कुटुंबियावर लक्ष ठेवले. याचदरम्यान, संधी मिळताच पीडिताच्या आईने शनिवारी स्थानिक पोलीस गाठून हा सर्व प्रकार सांगितला. पीडिताच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आहे. हे देखील वाचा- नाशिक: गेम खेळायला मोबाईल न दिल्याच्या रागातून गावातील शेतकऱ्याची हत्या; 19 वर्षीय युवक अटकेत
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. पीडिताची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. भारतीय दंड विधायक अंतर्गत आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला दोन आठवड्यासाठी न्यायलयीन कोठडीत पाठवले आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.