आसाममध्ये कार आणि ट्रकच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू
Road Accident in Assam (Photo Credit - ANI)

आसाममध्ये मंगळवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात (Accident) आसाममधील उदलगुरी जिल्ह्यातील ओरांग परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 15 वर झाला. या अपघातात एका कारला मालवाहू ट्रकने जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहेl. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.

रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या अपघातांमध्ये  अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातदेखील रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत जानेवारी ते ऑक्टोबर 2019 या दहा महिन्यांत 2,348 रस्ते अपघात झाले. या अपघातांत 322 जणांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - पुणे: दिवे घाटात वारकर्‍यांच्या दिंडीला अपघात; संत नामदेव यांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांंच्यासह एकाचा मृत्यू; 15 जखमी)

एएनआय ट्विट - 

राज्य सरकार दरवर्षी रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षा मोहीम राबवते. यात वाहतूक पोलीस, परिवहन विभागाबरोबरच विविध सामाजिक संस्थाही सहभागी होतात. परंतु, तरीदेखील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होत नाही. दारू पिऊन वाहन चालविणे, दुसऱ्या वाहनांना ओव्हरटेक करणे इत्यादी कारणांमुळे राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे.