कश्मीर डॉक्टरचे एका महिलेसोबत जबरदस्तीने अश्लील फोटो काढून 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांना अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

कश्मीर येथील डॉक्टरचे एका महिलेसोबत जबरदस्तीने अश्लील फोटो काढून 10 लाखांची खंडणी (Extortion) मागितल्याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिघांना अटक केली आहे. ही घटना कोलकाता (Kolkata) येथे घडली. आरोपी महिलेने आपल्या छातीत वेदना होत असल्याचे सांगत डॉक्टरांना आपल्या घरी बोलावले होते. आरोपी महिलेचा तपास करत असताना इतर 3 आरोपींनी त्यांचे अश्लील फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करु नये यासाठी डॉक्टरांकडून 10 लाखांची खंडणी वसूल केली. त्यानंतर डॉक्टरांनी स्थानिक पोलिसात धाव घेवून हा सर्वप्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या निवासस्थानी जावून त्यांना अटक केली.

क्लिनिकमध्ये असताना कश्मीर डॉक्टरांना एका महिलेचा फोन आला होता. तसेच छातीत वेदना होत असल्याचे सांगत आरोपी महिलेने डॉक्टरांना तिच्या राहत्या घरी बोलावून घेतले. घरी पोहचल्यानंतर डॉक्टरांनी महिलेची तपासणी करायाला सुरुवात केली. त्यावेळी त्या ठिकाणी 3 तरुण येऊन डॉक्टरांचे जबदस्तीने त्या महिलेसोबत अश्लील फोटो काढून त्यांच्याकडून 10 लाख रुपयांची मागणी केली. जर पैसे न दिल्यास हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करु अशी धमकीही त्यांनी दिली. त्यावेळी घाबरलेल्या अवस्थेत डॉक्टरांनी त्यांना होकार दिला. त्यानंतर सर्व आरोपी डॉक्टरांसह त्यांच्या राहत्या घरी गेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना 5 लाख 15 हजार रोख रक्कम तर, 5 लाखांचे आपल्या पत्नीचे दागिने त्यांच्या स्वाधीन केले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच संबधित डॉक्टरांनी स्थानिक पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हे देखील वाचा-बीड: धक्कादायक! पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना शहर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला. धक्कादायक म्हणजे, त्यापैकी एका आरोपीच्या घरात पोलिसांचा गणवेश आढळला. सध्या चारही आरोपींना जामीन मंजून झाला असून पोलिसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.